दिंडोरीत पिकअप उलटून स्विफ्ट कारवर आदळली

दोन महिला बचावल्या; वाहतूक कोंडी

दिंडोरी : प्रतिनिधी
वणी – दिंडोरी – नाशिक महामार्गावरील दिंडोरी शहरात गर्दीत वेगाने येणारी पिकअप वाहनचालकाचा ताबा सुटून उलटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर जाऊन आदळली. कारमध्ये दोन महिला बसलेल्या होत्या, मात्र त्या सुदैवाने बचावल्या. स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पिकअप क्रमांक (एमएच 15 जेसी 7455) ही अवनखेड (ता. दिंडोरी) येथून सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पुदिना पूर्ण भरून नाशिककडे जात असताना शहरातील बाजारपेठ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी पिकअपचालकाचे नियंत्रण सुटून दिंडोरी शहरातील साईनाथ पाववडे दुकानासमोर उभ्या असलेल्या स्विफ्ट कार (एमएच 15 एचजी 6334) या वाहनावर जाऊन आदळली.
त्यात एक महिलेला किरकोळ मार लागला. दिंडोरी शहरात सायंकाळी वाहनाची गर्दी असतानासुद्धा पिकअपचालक वाहन वेगाने चालवित होता. चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर पिकअपचालक फरार झाला. बघ्यांची मोठी गर्दी होत वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेन मागवत गाडी दूर करत वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास दिंडोरी पोलिस करीत आहेत.

2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *