इगतपुरी: निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पावसाचा तडाखा, वातावरणातील असमतोलपणा आणि त्यातच सततच्या ढगाळ वातावरणामुळे झाडांचे बिघडलेले आरोग्य व गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे यंदा ऐन उन्हाळ्यात येणार्या गावठी रानमेव्याला वाईट दिवस आले आहेत. सध्याच्या वाईट परिस्थितीमुळे व वेळोवेळी येणार्या ढगाळ वातावरणामुळे गावरान आंबा, जांभूळ व करवंदांसह आवळ्याच्या कोवळ्या फळांना फटका बसल्यामुळे रानमेव्याच्या उत्पादनात घटीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाभरात आंब्याबाबत परिस्थिती सारखीच राज्याच्या कृषी नकाशावर फळ आणि रानमेव्याचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे.