दहावीचा निकाल जाहीर; हा विभाग पुन्हा नंबर वन

नाशिक: प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेतही कोकण विभाग प्रथम क्रमांकावर होता. बारावी पाठोपाठ दहावीत देखील मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के लागला. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.14 तर मुलांचे 92.31 आहे .राज्याचा निकाल 94.10 टक्के आहे. यंदा निकालाचा टक्का 1.71 टक्क्यांनी घसरला आहे. राज्यात16 लाख 11 हजार विध्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 6 हजार मुले तर7 लाख 47 हजार मुली नी परीक्षा दिली होती.19 ट्रान्सजेंडर ही परीक्षेला होते. यंदा राज्यातील दहावीचा निकाल – ९४.१० टक्के लागला.नागपूर विभाग सर्वात कमी – ९०.७८ टक्के,मुंबई विभाग – ९५.८४ टक्के निकाल लागला.

 विभागनिहाय निकाल

पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
संभाजीनगर : ९२.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
कोकण : ९९.८२ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *