मेष रास
मेष राशीसाठी आज आज दिवस थोडा संघर्षमय जाईल, नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज वाहने जपून चालवा ठरवलेल्या कामाबद्दल शांतपणे बसून विचार करणे गरजेचे ठरेल
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज छोट्या छोट्या घातक सवयी बदलल्या, तर भरपूर काम करू शकाल, महिलांनी त्यांचा दृष्टिकोन बदलावा.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज भूतकाळातील मिळालेल्या अपयशात गुंतून पडलात, तर प्रगती होणार नाही तरुणांचे विवाह ठरतील
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज पूर्वी केलेले आर्थिक नियोजन आता उपयोगी पडेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज समोरच्या माणसाचा चढलेला पारा कसा खाली आणायचा, याचे चातुर्य तुमच्याकडे असल्यामुळे इतरांची मने जिंकाल.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज लांबच्या प्रवासाचे योग येतील, आर्थिक नियोजनांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता राहील
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज मित्रांबरोबर सहलीच्या बेत ठरवाल, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज खाण्यावर बंधन पाळायला हवे नाहीतर पचनशक्ती बिघडेल, वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतल्यामुळे सौख्य लाभेल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज वागण्यामध्ये चैनीला महत्त्व द्याल, नोकरी व्यवसायात स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे होतील
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज गायन वादन अभिनय नृत्य यासारख्या कलांमध्ये प्राविण्य मिळेल, महिलांना आर्थिक लाभ कमी होतील
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे थोडा मानसिक ताण राहील, परंतु भाग्याची साथ असल्यामुळे कोणत्याही टोकाच्या गोष्टी घडणार नाहीत.