नाशिकरोड : जेल रोड परिसरातील ख्रिश्चन कॉलनीत राहणार्या 38 वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सोनाली आनंद त्रिभुवन (वय 38) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली यांनी आपल्या राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, तब्येत अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.