विहिरीत पडलेल्या बछड्याला सुखरूप बाहेर काढले

चांदवड : वार्ताहर

तालुक्यातील पारेगाव येथे एका 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. पारेगाव येथील किसन रघुनाथ बागूल यांच्या शेत गट नंबर 151 मधील विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची माहिती शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास भवर यांनी रविवारी (दि. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास वनविभागाला दिली.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनमंडळ अधिकारी अजय शिंदे, वनरक्षक वाल्मीक वरगळ, विजय टेकर, वनसेवक भरत वाघ, वसंत देवरे, शफिक सय्यद, वाहनचालक अशोक शिंदे व रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी 60 ते 70 फूट खोल विहिरीत वन कर्मचार्‍यांनी क्रेनच्या सहाय्याने पिंजरा सोडला आणि अथक प्रयत्नांनंतर बिबट्याच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी बचावकार्यामुळे वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेचे आणि सहकार्याचे महत्त्वपूर्ण योगदान दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *