सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात सोमवारी (दि.12) दुपारनंतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला. तालुक्यातील सोनारी येथे वीज पडून दोन शेळ्या तर खंबाळे येथे वीज पडून गाय ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
सोमवारी तालुक्यात सर्वदूर जोरदार अवकाळी पाऊस बरसला. सोनारी येथे सुनील भिकाजी कडभाने यांच्या दोन शेळ्यांवर वीज पडली. त्यात दोन्ही शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. तर सायंकाळी खंबाळे येथील सुकदेव म्हाळू खाडे यांच्या गट नंब 565 मध्ये वीज पडल्याने गायीचा मृत्यू झाला. सोमवारी तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाल्याने अनेकांची धांदल उडाली. सकाळपासून वातावरणात उकाडा होता. दुपारनंतर अनेक गावांमध्ये वादळी अवकाळी पाऊस झाला. यात सोनारी आणि खंबाळे येथील शेतकर्यांचे पशुधन बळी पडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंडळनिहाय झालेला पाऊस
सिन्नर- 9.3 मिमी,
पांढुर्ली-17.40,
देवपूर-10.20,
वावी-18.00,
डुबेरे-22.00,
शहा-8.07.