सर आली धावून, प्राणी गेले पळून!

पावसामुळे बुद्धपौर्णिमेला प्राणी गणनेत अडथळा

नाशिक ः प्रतिनिधी
दर बुद्धपौर्णिमेला वन विभागाकडून अभयारण्यात प्राणीगणना केली जाते.

यंदा प्राणी गणनेत पावसामुळे अडथळा आल्याने प्राणी गणनेवर पाणी फेरलेे. नाशिक पश्चिम भागातील

अंजनेरी आणि मुळेगाव येथील पाणवठ्यावर कॅमेर्‍यांसह मचाण लावण्यात आले होते.

कर्मचार्‍यांच्या उपस्थितीसह प्राणी गणनेसाठी सज्जता करण्यात आली होती,

पंरतु अवकाळी पावसामुळे प्राणी पाणवठ्यावर आले नाही,

अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी दिली.

पावसामुळे प्राणी पाणवठ्यावर येण्यास अडथळे आले.

कळसूबाई व भंडारदरा या अभयारण्यांतील माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याचे

सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांनी सांगितले.

मोजके पाणवठे असल्याने प्राणी या पाणवठ्यांवर पाणी प्यायला येतात.

त्यामुळे अचूक आकडा मिळून प्राणी गणना केली जाते.

कोणत्या भागात कोणते प्राणी आढळतात किंवा त्यांचे प्रमाण किती आहे,

हे माहिती करून घेण्यासाठी प्राणी गणना केली जाते.

या गणनेसाठी अभयारण्यासह राखीव वनसंवर्धन क्षेत्रात

मचाणी उभारण्यात आल्या आहेत.

प्राण्यांची विष्ठा आणि पावलांचे ठसे जुन्या पद्धतीसह कॅमेरा ट्रॅपिंग,

ड्रोन टॅन्झॅक्ट मेथड या नव्या पद्धतीने प्राणी गणना करण्यात येते.

नैसर्गिक तलाव, पाणवठे व झरे आदी पाण्याच्या ठिकाणी

वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. बुद्धपौर्णिमेला प्रकाश चांगला असतो.

त्यामुळे मचाणवर बसून प्राणी गणना केली जाते.

 

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात
नाइट जार, नाइट हेरॉन

नाशिक ः प्रतिनिधी
बुद्धपौर्णिमेला वन्यप्राणी गणना करणे, हे एका विशिष्ट पारंपरिक पद्धतीचे कार्य आहे.

या दिवशी उन्हाळ्यातील चंद्रप्रकाश जास्त असल्यामुळे आणि

जंगलातील पाणी कमी झाल्याने प्राणी पाणी पिण्यासाठी एकत्र येतात.

या संधीचा उपयोग करून वनविभागातर्फे वन्यप्राणी गणना केली जाते.

महाराष्ट्रातील पहिला रामसर दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर

वन्यजीव अभयारण्यात बुद्धपौर्णिमेनिमित्त वन्यप्राणी गणना करण्यात आली.

यावेळी अभयारण्य परिसरात जंगली ससा बघावयास मिळाला.

याव्यतिरिक्त बिबट्या, रानमांजर, उदमांजर, कोल्हे, तरस, मुंगूस आदी

प्राणी दिसतात. गेल्या दोन दिवसांपासून अभयारण्य परिसरात

मुसळधार पाऊस होत असल्याने वन्यप्राणी गणनेत अडचणी निर्माण झाल्या.

तरीही पक्षिमित्र, वनकर्मचारी यांनी विविध मचाणवर बसून प्राणी गणना केली

. वटवाघूळ, नाइट जार, नाइट हेरॉन आदी पक्षी व सस्तन प्राणीदेखील

बघावयास मिळाले. घोणस व पाणसापाचे देखील दर्शन झाले.

प्राणी गणनेत सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे, वनपाल संदीप काळे,

वनरक्षक आशा वानखेडे, नेचर क्लब ऑफ नाशिकचे

अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, डॉ. अनिल माळी, उमेशकुमार नागरे, अनंत सरोदे,

गंगाधर आघाव, प्रमोद दराडे, अमोल दराडे, रोशन पोटे, विकास गारे,

रोहित मोगल, पंकज चव्हाण आदींसह वनकर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *