गोवंश कायद्याचे उल्लंघन; चौघे हद्दपार होणार

मालेगावसह परिसरातील 175 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

मालेगाव : नीलेश शिंपी
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश कायद्याचे तंतोतंत पालन करावे, यासाठी 2015 पासून ते आजपर्यंत गोवंश कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या 175 गुन्हेगारांवर गोवंश कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत चौघांचे हद्दपार प्रस्ताव तयार केले आहेत. त्यामुळे गोवंश गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश कायद्याचे तंतोतंत पालन करावे, यासाठी 2015 पासून ते आजपर्यंत गोवंश कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
गुन्हेगारांची मालेगाव शहर व कॅम्प असे उपविभागनिहाय यादी तयार केली. त्यात एकूण 175 गुन्हेगारांवर गोवंश कायद्यान्वये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पोलिसांनी 16 ठिकाणी छापा टाकून एक कोटी सहा लाख 45 हजार 800 रुपये किमतीचे 149 गोवंश जनावरे जप्त केली आहेत.

डोअर टू डोअर सर्व्हे
मोकाट व बेवारस गोवंश जनावरांमुळे अपघात व रहदारीस अडथळा होण्याच्या

तक्रारी वाढल्यावरून पोलिस व महापालिकेने संयुक्त कारवाई केली.

त्यात 45 जनावरे ताब्यात घेऊन पांजरपोळ येथे जमा केलेे आहे.

आगामी बकरी ईदच्या अनुषंगाने गोवंश कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर

कारवाईसाठी शहरात गो-स्कॉड तयार केला आहे.

त 1 पोलिस अधिकारी व 4 पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे

. गोवंश कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याकरिता डोअर टू डोअर

सर्व्हे करून पाळीव गोवंशासंदर्भातदेखील आवश्यक त्या कागदपत्रांची

विचारणा करण्यात येणार आहे.

पोलिस ठाण्याचे नाव छापा कारवाई संख्या

जप्त गोवंश जनावरे संख्या एकूण मुद्देमाल किंमत
मालेगाव शहर  – 2 6 1,35,800
आझादनगर  – 1 2 50,000
आयशानगर  – 1 6 1,55,000
पवारवाडी  – 3 18 4,67,000
रमजानपुरा  – 1 2 45,000
छावणी  – 5 84 87,78,000
किल्ला  – 3 31 10,15,000
एकूण – 16 149 1,06,45,800

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *