कत्तलीसाठी वाहतूक करणार्‍या गायींची सुटका, आरोपी जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ची धडाकेबाज कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
गायींची कत्तलीसाठी वाहतूक करत असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनासह एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने अटक केली आहे. कारवाईदरम्यान तीन गोवंश जातीच्या जिवंत गायींची सुटका करण्यात आली आहे.
दि. 17 मे 2025 रोजी गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 1 कडील अधिकारी पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार विलास चारोरकर व नितीन जगताप यांना गोपनीय माहिती मिळाली की, दसक ब्रिजमार्गे नाशिक रोडकडे एक बोलेरो पिकअप (क्र. एमएच-15-एचएच-9560) गायींची कत्तलीसाठी वाहतूक करत आहे.
सदर माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्याकडून कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर सपोनि हिरामण भोये यांच्या नेतृत्वाखाली सापळा लावण्यात आला. दसक ब्रिजजवळ सदर वाहन थांबवून आरोपी गणेश तानाजी मते (वय 40, रा. मुरंबीगाव, ता. इगतपुरी) यास ताब्यात घेण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन जिवंत गोवंश जातीच्या गायी आढळून आल्या. विचारणा केली असता त्याने गायी जुनेद खान (रा. कुरण, संगमनेर) याच्याकडे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली.
सदर महिंद्रा बोलेरो पिकअप व गायी असा एकूण 7 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हिरामण भोये, पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा रमेश कोळी, नाझीमखान पठाण, पोअं विलास चारोरकर, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, मपोअं अनुजा येलवे, चालक श्रेणी पोउनि किरण शिरसाठ व पोहवा सुकाम पवार यांच्या पथकाने  केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *