पेठ : गुजरात राज्यातील वावर (ता. कापराडा, जि. बलसाड) येथील रामदास शिवराम शवरा (वय 38) मोटारसायकलने (जीजे 15 डीआय 8122) पेठकडे येत होता. त्याचवेळी पेठकडून गुजरातकडे जाणारी विनाक्रमांकाची पल्सर घेऊन हिरामण लक्ष्मण बोरसे (वय 42) याने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात रामदास शवरा व हिरामण बोरसे घटनास्थळी मृत्युमुखी पडले. मोटारसायकलवरील अन्य नितीन मन्या शवरा, गणेश सोमा गाढवे गंभीर जखमी झाले. याबाबत शिवराम नानू शवरा यांच्या फिर्यादीनुसार पेठ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.