नाशिक: प्रतिनिधी
राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर येथे कार्यरत असलेले बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची मुंबईत अपर आयुक्त म्हणून पदोन्नती वर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागून होते. आज राज्य शासनाने अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नाशिक येथे बदलून आलेलं बाळासाहेब पाटील यांनी पालघर येथे अनेक चांगले उपक्रम राबविले होते.