नाशिक: प्रतिनिधी
शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता नाचवणे असे प्रकार आता सर्रास सुरू असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. काल रात्री श्रमीकनगरला असलेल्या खंडेराव महाराज मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत पार्क करण्यात आलेल्या चार ते पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. सकाळी ही बाब उघडकीस आली आहे. याबाबत वाहनधारकांनी पोलिसात धाव घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला आहेत, विविध भागात रात्रीच्या वेळी टवाळ खोर वाहनाची तोडफोड करत असल्याने पोलिसांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.