ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
उमराळे बुद्रुक : वार्ताहर
शासनामार्फत ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांमध्ये ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी जलजीवन मिशन नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, आजही ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित ठेकेदारांंच्या निष्काळजीपणामुळे ही वेळ आल्याचे ग्रामस्थ सांगतात.
उमराळे बुद्रुक येथील जलजीवन मिशन योजनेंंंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र, काही महिने ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे पाणीटंचाई उद्भवली असून, त्यात वीजकनेक्शन करून दिले नाही. त्यामुळे महिलांना इतरत्र पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागत आहे.
सदरील काम पूर्ण झाले असून, वाघाड धरणाजवळ उमराळे बुद्रुक ग्रामपंचायतीचे जलमिशन नळपाणी पुरवठा संबंधित ठेकेदाराने फोडल्याने उमराळे बुद्रुक दहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित का आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. जलजीवन मिशन नळपाणी पुरवठा योजनेंंतगत तब्बल एक वर्ष पूर्ण झाले आहे, तरीही उमराळे बुद्रुक येथे दर तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे.
वाघाड धरणाकडून गावात जाणारी नळपाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी फोडल्याने येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यात वीज कंपनी सतत भारनियमन केले जात असल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.