गुन्हे शाखा युनिट-2 ची उल्लेखनीय कामगिरी
सिडको : विशेष प्रतिनिधी
गुलशन कॉलनी, मुंबई नाका येथील घरफोडी प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला गुन्हेशाखा युनिट-2च्या पथकाने अटक केली आहे. या आरोपीकडून चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली मिळाली आहे.
24 ते 26 मे 2025 दरम्यान फिर्यादीटा बंद बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 38,58,700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखा युनिट-1 व 2 यांनी संयुक्तपणे काम करत चार आरोपींना अटक केली होती. मात्र, त्यांचा एक साथीदार आफताब ऊर्फ आत्या कुरेश सय्यद (वय 22, रा. मेहबूबनगर, वडाळागाव) फरार होता. गुन्हेशाखा युनिट-2 चे हवालदार मनोज परदेशी व हवालदार परमेश्वर दराडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ती माहिती प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार आणि पोलीस कर्मचारी यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. 10 जून रोजी गोसिया मशीद ागील भाग, वडाळागाव येथे सापळा रचून आफताबला अटक करण्यात आली. त्याने चौकशीदरम्यान गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याने त्याला पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई गुन्हेशाखा युनिट-2 चे सपोनि हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), सपोनि डॉ. समाधान हिरे, पो.नि. मुक्तारखान पठाण, सपउनि गुलाब सोनार, पोहवा परमेश्वर दराडे, मनोज परदेशी व अतुल पाटील यांनी केली.