अपघाताच्या दाहकतेने जनमानस हेलावले

सर्वत्र धूर… चारही बाजूंनी आगडोंब

प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार चारही बाजूंना आग लागली होती आणि धूर होता. काहीच दिसत नव्हते. काही वेळाने धूर कमी झाला त्यावेळी विमान कोसळल्याचे दिसले. ज्या इमारतीवर विमान कोसळले तिथे डॉक्टर राहतात, अशी माहिती मिळाली. विमान अपघातामधील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही वेळातच बचावकार्य सुरू करण्यात आले.

अहमदाबाद :
एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले. मात्र, टेकऑफच्या काही मिनिटांमध्येच कोसळले. लंडन येथे असलेल्या लेकाच्या भेटीसाठी सांगोलातील एक दाम्पत्यही या विमानाने प्रवास करीत होते. मात्र, या अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने लेकाला भेटण्याची आस अपूर्णच राहिली.
विमानाने दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण घेतले. मात्र, पुढील 5 ते 6 मिनिटांत हे विमान कोसळले. ज्यावेळी हे विमान कोसळले, अहमदाबादहून लंडनला जाणार्‍या विमानात सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव पवार आणि आशा पवार हेदेखील होते. दोघेजण आपल्या लेकाकडे लंडनला निघाले होते. त्यांचा मुलगा लंडनमध्ये असल्याने हे दोघे लेकाच्या भेटीसाठी जात होते. पण त्यांचा हा प्रवास अखेरचाच ठरला.
या विमान अपघातानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहून भीषणता लक्षात येतंय. हे विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडले. अपघाताच्या वेळी विद्यार्थी जेवण करत होते. विमान हॉस्टेलवर कोसळल्याने काही विद्यार्थी गंभीर जखमी तर काहींचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

  • लेकाला भेटायला निघाले, पण वाटेत मृत्यूने गाठले
  • सकिनाबेन दीड वर्षाच्या मुलीसोबत दीराच्या लग्नाला वडोदरा येथे आली होती. ती एअर इंडियाच्या विमानाने लंडनला परतत होती.
  • मुलीचा तिच्या वडिलांसोबतचा शेवटचा फोटो. लंडनमध्ये शिकणार्‍या आपल्या मुलीला विमानात बसवून वडील नुकतेच परतले होते, तेव्हा काही वेळातच विमान कोसळले.
  • बक्शी कुटुंबातील या दोन्ही मुली त्यांच्या आजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अहमदाबादला आल्या होत्या. लंडनला परतताना विमान अपघाताच्या बळी ठरल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *