समृद्धी महामार्गाची 19 दिवसांत दुरवस्था

शहापूरजवळील अंडरपासवर खड्डे; वीस दिवसांत अकरा अपघात

शहापूर ः प्रतिनिधी
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच जूनला झाले. हा महामार्ग पूर्णपणे सुरू झाला असला, तरी शेवटच्या टप्प्यातील कामात अनेक त्रुटी आता समोर येत आहेत. गेल्या वीस दिवसांत महामार्गावर अकरा अपघात झाले आहेत.
उद्घाटनाच्या 19 दिवसांतच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 76 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 2800 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या मार्गावर खड्डे पडल्याने आता वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आमणेपासून 31 किलोमीटरवर शहापूर महामार्गावर खड्डे पडले आहेत. ओव्हरपासच्या पुलावर हे खड्डे आहेत. यामुळे एमएसआरडीसीच्या कामावर टीका केली जात आहे.
समृद्धीवर असणार्‍या अंडरपासवर हे खड्डे पडले आहेत. खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला करण्याआधी या टप्प्यातील काही मार्गावर 24 पॅनलला भेगा आढळून आल्या होत्या. याशिवाय, छत्रपती संभाजीनगरमध्येही पुलावरील पॅनल कोसळले होते, तर गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरजवळ 40 मीटरवर सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *