आषाढी यात्रेसाठी तीनशे जादा बसेस

ग्रुप बुकिंग असल्यास थेट गावातून बस

नाशिक ः प्रतिनिधी
आषाढी एकादशी 6 जुलैला असून, पंढरपूर येथे भाविकांना दर्शनासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना गर्दीमुळे गैरसोय होऊ नये, यासाठी तीनशे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ग्रुप बुकिंग थेट गावातूनही करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे 2 ते 11 जुलैपर्यंत तीनशे जादा बसेस दररोज सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यात्रेच्या प्रमुख दिवसापूर्वी आणि नंतरच्या गुरुपौर्णिमेपर्यंत या बसेस विविध मार्गांवरून पंढरपूरपर्यंत थेट जाणार आहेत. प्रवाशांनी आपली जागा लवकर सुरक्षित करण्यासाठी ऑनलाइन किंवा विभागीय तिकीट काउंटरवर तिकिटे बुक करावीत. एमएसआरटीसीच्या योजनेनुसार पंढरपूर यात्रेची गर्दी लक्षात घेऊन, प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा म्हणून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या प्रत्येक अवस्थेत प्रवाशांना मदत व सूचना देण्यासाठी विशेष कर्मचारीही तैनात राहणार आहेत, असे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

आगार              मार्गाचे नाव
नाशिक              नाशिक ते पंढरपूर मार्गे अहिल्यानगर, करमाळा
मालेगाव            मालेगाव ते पंढरपूर मागेर्र् शिर्डी, अहिल्यानगर
सटाणा              सटाणा ते पंढरपूर मार्गे मनमाड, अहिल्यानगर
सटाणा               देवळा ते पंढरपूर मार्गे मनमाड
कळवण             कळवण ते पंढरपूर मार्गे मनमाड
मनमाड             मनमाड ते पंढरपूर मागेर्र् अहिल्यानगर
मनमाड             चांदवड ते पंढरपूर मागेर्र् मनमाड, अहिल्यानगर
येवला                येवला ते पंढरपूर मागेर्र् अहिल्यानगर
लासलगाव         लासलगाव ते पंढरपूर मार्गे कोळपेवाडी, शिर्डी
पिंपळगाव          पिंपळगाव ते पंढरपूर मार्गे नाशिक, अहिल्यानगर
नांदगाव             नांदगाव ते पंढरपूर मार्गे येवला
सिन्नर              सिन्नर ते पंढरपूर मार्गे अहिल्यानगर
इगतपुरी            इगतपुरी ते पंढरपूर मार्गे नाशिक
पेठ                    पेठ ते पंढरपूर मार्गे नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *