मोबाईल हॅक करून परस्पर घेतले 4.94 लाखांचे कर्ज

एक लाख रुपये परस्पर हस्तांतरित

सिडको : विशेष प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारीतून मोबाईल हॅक करून खातेधारकाच्या परवानगीशिवाय बँक कर्ज काढून, त्यातून एक लाख रुपये परस्पर इतर खात्यात वर्ग करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश विठ्ठल येवले (वय 49, रा. आम्रपाली लॉन्समागे, कामटवाडे, सिडको, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 19 जून 2025 रोजी त्यांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये घुसखोरी करून अज्ञाताने मोबाईल हॅक केला. त्यातून त्यांचे वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स मिळवून त्यांच्या नावावर एचडीएफसी बँक सातपूर शाखेतून एकूण चार लाख 94 हजार 756 रुपये खाजगी कर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर त्या कर्जातील 50 हजार रुपये अदनान हुसेन आणि 50 हजार रुपये अकिब इस्राईल यांच्या खात्यात दि. 19 जून 2025 रोजी परस्पर वर्ग करण्यात आले. फिर्यादीला यासंदर्भात कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा त्यांची परवानगी न घेता ही रक्कम त्यांच्या खात्यातून काढली गेली. त्यामुळे त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी तक्रार दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खैरनार तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *