नाशिक:प्रतिनिधी
दारू पिऊन आई वडिलांना शिवीगाळ तसेच मारहाण करणाऱ्या मुलाचा आई वडील तसेच मेहुण्या ने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मृताच्या पत्नीने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे विशाल पाटील असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मयत याला दारूचे व्यसन होते. दररोज पिऊन तो आई वडील तसेच मेहुण्याला शिवीगाळ करत असत. या त्याच्या वागणुकीला कंटाळुन उशीने गळा आवळून खून केला. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. शव विच्छेदन करताना हा खुनाचा प्रकार उघडकीस आला, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.