ओझरला भरदिवसा घरफोडी

अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

ओझर : वार्ताहर
घरातील महिला घर बंद करून मुलाला घेण्यासाठी शाळेत गेल्याची संधी साधून चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडून कपाटातून 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि. 26) दिवसाढवळ्या ओझर येथे घडली. आठवडाभरात चार घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुरुवारी दुपारी सव्वाबारा ते साडेबाराच्या दरम्यान गीतांजली सचिन जाधव (रा. फ्लॅट नं.3, भूमी हाइट्स, विमलनगर, ओझर) या घर बंद करून मुलाला घेण्यासाठी शाळेत गेल्या असतानाची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाची सोन्याची लाँग पट्ट्याची पोत, दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन, दीड तोळे वजनाची सोन्याची चेन, गणपती लॉकेटसह दीड तोळे वजनाचे सोन्याचे दोन सोन्याचे बिस्किटे , दीड तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, सोन्याच्या चार अंगठ्या असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार गीतांजली जाधव यांनी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घरफोडी तपासकामी श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वानाने अर्धवट मार्ग दाखवला असून, घरफोडी गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एम. के. कराड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *