नावात काय आहे?

शेक्सपिअरने नावात काय आहे? असा प्रश्न विचारला होता. गुलाबाच्या फुलाला गुलाब म्हटले नाही तरी सुगंध हा येणारच. म्युच्युअल फंड योजनांबाबत मात्र एका एका योजनेची नावे वाचता-वाचता गुंतवणूकदारांची दमछाक होत असेल. योजनेच्या नावांमध्ये सेबीने महत्त्वाचे बदल करणे म्युच्युअल फंडांना सक्तीचे केले. यामुळे आता गुंतवणूकदारांना आता सोपे होईल. उगाचच ब्लुचीप, इमजिंग ब्लुचिप अशी नावे आता नामशेष होतील. या बदलाचे स्वागत केले पाहिजे.

1) इन्व्हेस्को इंडिया अ‍ॅग्रसिव्ह हायब्र्रिड फंड
ज्या योजनेत शेअर्समध्ये किमान 65 टक्के गुंतवणूक आहे, अशी योजना म्हणजे अ‍ॅग्रेसिव्ह हायब्रिड मग ज्या ठिकाणी ऋणपत्रांची गुंतवणूक जास्त आहे अशा योजना त्यांना अ‍ॅग्रसिव्ह हा शब्द वापरता येणार नाही. 30 जून 2018 या दिवशी सुरू झालेल्या वरील योजनेकडे 704 कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनासाठी आहे. एक वर्षे भांडवलवृध्दी 6.6 टक्के, 3 वर्षे 21 टक्के अशी आकडेवारी आहे.
2) एच.डी.एफ.सी. बँकिंग अ‍ॅण्ड फायनाशियल फंड
1 जुलै 2021 या दिवशी सुरू झालेल्या या योजनेला 4 वर्षे झाली तरी समाधानकारक वाढ नाही. एच.डी.एफ.सी. म्युच्युअल फंडाच्या इतर योजनांमध्ये आपली गुंतवणूक वळती करणे योग्य राहील.
3) टाटा मिड कॅप फंड
या योजनेकडे 4701 कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापन करण्यासाठी आहे. 1 जुलै 1994 या दिवशी ही योजना सुरू झाली होती. म्हणून आता 31 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. परंतु मागील 3 वर्षे वार्षिक सरासरी वाढ चांगली असल्याने एक वर्षाच्या घसरणीकडे दुर्लक्ष करावे. ज्यावेळेस क्वॉन्ट मिड कॅप 5 तारांकित चिन्हे 9 हजार कोटींची मालमत्ता आणि 12.6 टक्के एक वर्षाची घसरण अशी आकडेवारी जेव्हा दाखवितो तेव्हा मिडकॅप फंड यांची जोखीम काय असते हे गुंतवणूकदारांना समजेल.
अ‍ॅक्सिस क्वॉन्ट फंड
1 जुलै 2021 या दिवशी ही योजना सुरू झाली. क्वॉन्ट ही संकल्पना आपल्याकडे अजून रुजली नाही हे कटू सत्य आहे. योजनेकडे फक्त 966 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. अ‍ॅक्सिस म्युच्यअल फंडाच्या दुसर्‍या योजनेकडे गुंतवणूक वळती करणे हा निर्णय योग्य राहील.
मिराई अ‍ॅसेट हेल्थकेअर फंड
2 जुलै 2018 या दिवशी सुरू झालेल्या योजनेकडे 2691 कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनासाठी आहे. एक वर्षाची भांडवलवृध्दी 14.6 टक्के तर 3 वर्षांची 23.9 टक्के आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराकडे किमान एक फार्मा सेक्टर फंड असावा.
एस.बी.आय. कॉन्ट्रा फंड
5 जुलै 1999 या दिवशी ही योजना सुरू झाली. योजनेकडे 45496 कोटी रुपये मालमत्ता व्यवस्थापनसाठी आहे. एक वर्षाची भांडवलवृध्दी फक्त 1.4 टक्के आहे. कोटक कॉन्ट्रा 1.8 टक्के तर इन्व्हेस्को कॉन्ट्रा 8.1 अशी भांडवलवृध्दी आहे. परंतु तिन्ही योजना 10 वर्षाची वार्षिक सरासरी वाढ 16 टक्के दाखवतात. त्यामुळे कॉन्ट्रा फंड असलाच पाहिजे अशी गरज नसावी.
एस.बी.आय. हेल्थकेअर फंड
5 जुलै 1999 मालमत्ता 3689 कोटी वार्षिक वाढ 17.3 टक्के तीन वर्षे 28.9 टक्के एकतरी हेल्थकेअर सेक्टर योजना असावी.
एस.बी.आय. टेक्नॉलॉजी फंड
मालमत्ता 3052 कोटी एक वर्षाची वाढ फक्त 9 सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी टेक्नोलॉजी फंडाची जोखीम होऊ नये.
एस.बी.आय. कन्झ्मशन फंड
मालमत्ता 3052 कोटी 1 वर्षाची वाढ फक्त 3 दुर्लक्ष करणे चांगले.
मोतीलाल ओसवाल निफ्टी मायक्रो कॅप 250 इंडेक्स फंड
मालमत्ता 2359 कोटी रुपये सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी ही योजना नाही. परंतु जोखीम घेण्याची तयारी आहे. लार्ज कॅप, लार्ज अ‍ॅण्ड मिड कॅप फ्लेक्झी कॅप मल्टी कॅप स्मॉल कॅप अशा वेगवेगळ्या योजना आहेत. जोखीम घेण्याची मानसिकता आहे. मायक्रो कॅप हा गुंतवणूक प्रकार गुंतवणूक करणे योग्य राहील. 5 जुलै 2023 या दिवशी योजना सुरू झाली. 2359 कोटी रुपये मालमत्ता आहे.
संवेदनशील निर्देशांकातील बदल
शेअर बाजाराविषयी खूप गप्पा करणार्‍या अनेकांना अजूनसुध्दा निर्देशांक समजलेला नाही. त्यामुळे या निर्देशांकात काय बदल होतात त्याचा काय परिणाम होतो त्याविषयी प्रचंड अज्ञान आहे. 23 जूनला निर्देशांकातून 2 शेअर्सची हकालपट्टी झाली. एक नेसले आणि दुसरा इंडसिंड बँक त्याऐवजी ट्रेड आणि भारत इलेक्ट्रर्शनिक्स या दोन शेअर्सचा समावेश झाला.
नेसले या शेअर्सचे अगोदरचे नाव फूड स्पेशालिटी या कंपनीच्या शेअरचा समावेश 1978-79 ला या आर्थिक वर्षात निर्देशांक 100 हा धरून जे 30 शेअर्स विचारात घेतले होते त्यात एक फूड स्पेशालिटी हा शेअर होता. त्यावेळच्या 30 शेअर्सपैकी फक्त 7 शेअर्सना निर्देशांकातील आपले स्थान सांभाळता आले आहे. त्या शेअर्सची नावे अशी आहेत. 1) हिंदुस्थान युनिलिव्हर, 2) आय.टी.सी.,3) एल अ‍ॅण्ड टी, 4) महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, 5) रिलायन्स, 6) टाटा स्टील, 7) टाटा मोटर सुरुवातीच्या 23 शेअर्समध्ये वेळोवेळी बदल झाले आणि आता जे शेअर्स निर्देशांकात आहे त्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 166 लाख कोटी रुपये आहे. बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार मूल्यांकन 463 लाख कोटी रुपये आहे आणि म्हणून 463 लाखांपैकी 166 लाख कोटी रुपये निर्देशांकाचे मूल्यांकन म्हणून टक्केवारीच्या भाषेत मोजमाप करायचे ठरवले तर ते 35.85 टक्के आहे. उगाचच यांच्या चढउताराबद्दल जास्त विश्लेषण करण्याऐवजी 64 टक्के बाजार मूल्यांकन त्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. कारण पुन्हा या 166 लाखांपैकी रिलायन्स 20.52, टी.सी.एस. 12.50, एच.डी.एफ.सी. बँक 14.45 आय.सी.आय. बँक 10.4 लाख अशा निवडक कंपन्या निर्देशांकात मोठा हिस्सा दाखवतात म्हणून निर्देशांकाकडे दुर्लक्ष करा हा गुंतवणूकदारांना संदेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *