साप्ताहिक राशिभविष्य

दि. 29 जून ते 5 जुलै 2025
पुरुषोत्तम नाईक

मेष : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू, बुध अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक दिलासा मिळेल. शेअरमध्ये लाभ होतील. गुंतवणूक लाभदायी ठरेल. नोकरदारांना कष्टाची कामे करावी लागतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. मंगलवार्ता कळतील. आरोग्य चांगले राहील. कुपथ्य टाळा.
वृषभ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. पैसे हातात येतील पण टिकणे कठीण आहे. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : सतर्क रहा
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शुक्र प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. ऐशोरामात पैसे खर्च होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरदारांना जास्त काम करावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या आर्थिक समस्या सुटतील. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. सतर्क रहा.
कर्क : अचानक धनलाभ
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील. शेअरमध्ये लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, गुरू अनुकूल आहेत. बुध, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे मिळतील. खर्च वाढतील. शासकीय कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते चुकतील. आरोग्यप्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
कन्या : आर्थिक लाभ
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदारांची कामे वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल. शेअरमध्ये लाभ होतील. आरोग्य प्रश्नांबाबत सतर्क रहा.
तूळ : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू अनुकूल आहेत. राहू, केतू अनुकूल आहेत. शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे यशस्वी होतील. आरोग्यप्रश्न सतावतील.
वृश्चिक : भाग्योदय होईल
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. शासकीय कोर्ट, कचेरीच्या कामात अडचणी निर्माण होतील. नोकरदारांनी वरिष्ठ, सहकारी व कौटुंबिक वादविवाद टाळावेत. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. प्रकृती जपा.
धनु : मंगलकार्य होतील
या सप्ताहात मंगळ, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, बुध, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च आटोक्यात येतील. घरात मंगलकार्य होतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते जुळतील. हितशत्रू बळावतील. आरोग्याबाबत सतर्क रहा.
मकर : खर्च वाढतील
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. शासकीय, कोर्ट, कचेरीचे प्रश्न लांबणीवर पडतील. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची कामे पूर्ण होतील.
कुंभ : मानसिक अस्वास्थ्य
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वाद टाळा. सामंजस्य दाखविणे गरजेचे आहे. नोकरदारांची प्रगती मंदावेल. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते जुळतील. आरोग्य जपा.
मीन : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. सावकार, बँका, घेणेकरी तगादा लावतील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. विरोधकांच्या कारवाया वाढतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *