कृषी शिक्षण प्रवेशप्रक्रिया व संधी

शाच्या आर्थिक प्रगतीत कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी शिक्षण आणि संशोधनाचा शेतीच्या उत्पन्नवाढीत सिंहाचा वाटा आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि विकासदर शेतीच्या उत्पादकतेवर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच कृषी संलग्न व्यवसायाची भरभराट होण्यासाठी कृषी विषयांतील शिक्षणास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे कृषी शिक्षण काळानुरूप गरजेचे बनले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली हे देशातील कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार यांच्यात समन्वय ठेवणारी शिखर संस्था आहे. या अंतर्गत देशात विविध कृषी विद्यापीठे व संशोधन केंद्र कार्यरत आहे. महाराष्ट्र्रात राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कार्यरत आहे. आज या चारही कृषी विद्यापीठांतर्गत राज्यात शासकीय व विनाअनुदानित तत्त्वावर कृषी व कृषी संलग्न विविध महाविद्यालये कार्यरत आहेत. या महाविद्यालयांमार्फत मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया महाराष्ट्र राज्य सीईटी सेलमार्फत राबविली जात आहे. बी.एस्सी. (कृषी) पदवी किंवा तत्सम प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना 12 वी (विज्ञान)नंतर झउच/झउइ/झउचइ या विषयातील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (चकढ-उएढ)/ गएए/ छएएढ यापैकी कोणतीही एक परीक्षा देणे अनिवार्य आहे. सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या तसेच इतर आदिभार यांच्या आधारावर बी. एस्सी. (कृषी) किंवा तत्सम पदवीकरिता प्रवेश देण्यात येतो.
बी. एस्सी. कृषीसाठी प्रवेश अर्ज ः
प्रथमतः विद्यार्थ्यांनी प्रवेश माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. त्यानंतर कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरावा. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी स्कॅन करून ठेवावे. अर्जामधील सर्व माहिती भरून तसेच दिलेल्या जागेत सर्व कागदपत्रे अपलोड करावी. सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज ऑनलाइन पद्धतीने जमा करावा. अपलोड केलेले कागदपत्रे स्पष्ट व वाचनीय असावे. सीईटी सेलद्वारे दिलेल्या वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल तसेच गुणवत्ता, दिलेला विकल्प, आरक्षण व उपलब्ध जागा यावरून प्रवेश वाटप प्रक्रिया केली जाते. अधिक माहितीकरिता विद्यार्थ्यांनी आयुक्त व सक्षम अधिकारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रकाशित करण्यात येणारे केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेची पुस्तिका वाचणे आवश्यक आहे.
शेतकरी पाल्यांना अधिक फायदा :
शेतकर्‍यांच्या पाल्यांना 6 टक्के राखीव जागेचा लाभ घेता येतो. त्याकरिता विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज करताना विहित नमुन्यातील पालकांचा तहसीलदार यांनी दिलेले शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर प्रवेश अर्ज करताना विद्यार्थ्यांनी पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या नावे असणारा 7/12 उतारा जोडल्यास 12 गुणांचा आदिभार/ अतिरिक्त गुण मिळतात. त्याचबरोबर पालकांचा शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र जोडल्यास 6% आरक्षणाचादेखील फायदा मिळू शकतो. तसेच विद्यार्थ्यांनी अकरावी किंवा बारावीमध्ये छडड, छउउ जिल्हा, राज्य किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा
स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला असल्यास त्याचबरोबर राज्यस्तरीय वादविवाद, निबंध किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्याचे प्रमाणपत्र जोडल्यास 2 गुणांचा आदिभार/ अतिरिक्त गुण मिळतात.
महाविद्यालय निवडताना घ्यायची काळजी : महाराष्ट्रात शासकीय तसेच विनाअनुदानित तत्त्वावर खासगी कृषी महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांनी यातूनच प्राधान्यक्रमाने महाविद्यालय निवड करणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम नोंदवताना योग्य विकल्प निवडणे महत्त्वाचे ठरते. महाविद्यालय निवडताना विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. महाविद्यालयाची वर्गवारी सोबतच महाविद्यालयात असलेल्या सर्व सोयी, महाविद्यालयाचे शुल्क, तसेच महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता ओळखणे गरजेचे आहे. महाविद्यालयात अनुभवी तसेच निकषानुसार उच्च शिक्षित कायमस्वरूपी प्राध्यापक व मुबलक मनुष्यबळ असणे सर्वांत महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाची इमारत व त्यामध्ये असलेल्या विविध प्रयोगशाळा अद्ययावत व परिपूर्ण आहे की नाही, याचीदेखील विद्यार्थ्यांनी खात्री करावी. महाविद्यालयाकडे निकषानुसार शेतजमीन तसेच प्रात्यक्षिकांसाठी प्रक्षेत्र व सर्व सुविधा असणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार विद्यार्थी व पालकांनी करणे गरजेचे आहे.
कृषी पदवीधारकांकरिता संधी :
कृषी शाखेमधून पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता खासगी तसेच सरकारी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कृषी पदवीचे शिक्षण झाल्यावर पदव्युत्तर शिक्षणासारखे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकता. कृषी शाखेच्या पदवीधारांकरिता कृषी विद्यापीठे, कृषी विभाग या सरकारी क्षेत्राव्यतिरिक्त अनेक खासगी बियाणे कंपन्या, बँका, कीटकनाशक कंपन्या, ठिबक तुषार सिंचन क्षेत्रातील कंपन्या इत्यादी ठिकाणी मागणी होत आहे. तसेच या पदवीधरांना स्वतःचा कृषिपूरक उद्योग उभारण्यास मोठा वाव आहे. कृषी पदवीधारकांसाठी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये बीजोत्पादन, प्रक्रिया उद्योग रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कृषी पदवी व पदव्युत्तरधारकांना कृषी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांत व्याख्याता तसेच कृषी तंत्रनिकेतने व कृषी तंत्रविद्यालयांमध्ये शिक्षक या पदावर, शेती विषय असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये व कृषीविषयक किमान कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत शिक्षक म्हणून काम करता येते. कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन शास्त्रज्ञ या पदावर संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रावर शास्त्रज्ञ म्हणून काम करता येते. राज्य सरकारच्या कृषी विभागात विविध पदांवर काम करण्याची संधीही उपलब्ध आहे. याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींमध्येही विविध कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक या पदावर काम करण्याच्या संधी आहेत. शिवाय, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी किंवा विकास अधिकारी या पदावर कृषी पदवीधरांची नेमणूक होते. खासगी क्षेत्रातही कृषी पदवीधारकांना अनेक बियाणे, कीटकनाशके, खते, ठिबक व तुषार सिंचन कंपन्या, खासगी क्षेत्रातील बँका, प्रक्रिया उद्योग, तसेच कृषी सेवा सल्ला, विमा कंपन्यांमध्ये काम करता येते. पदवीधारकांना प्रसारमाध्यमांमध्ये आकाशवाणी, दूरदर्शन किंवा कृषिपत्रकारिता क्षेत्रातही करिअरच्या संधी आहेत. त्याचबरोबर कृषी पदवीधर माती व पाणी परीक्षण केंद्र स्थापन करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करू शकता. कृषी पदवीधर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकता. कृषी पदवीधर एक प्रगतशील शेतकरी बनून शेती व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून इतर शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करून इतर शेतकर्‍यांसमोर एक आदर्श उभा करू शकतो.
कृषी कौशल्य विकासाच्या संधी : कृषी पदवीधरांना विविध कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध आहे. जसे की, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, मित्र कीटक संगोपन, व्यावसायिक रेशीम शेती, मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, जैविक खत आणि जैविक कीटकनाशक उत्पादन, माती वनस्पती व पाणी तपासणी केंद्र, काढणी पश्चात प्रक्रिया तंत्रज्ञान, कुक्कुटपालन तंत्रज्ञान, व्यावसायिक फलोत्पादन, कृषी कचरा व्यवस्थापन प्रणाली, फुलशेती आणि प्रांगण सौंदर्यीकरण तंत्र, लागवड उत्पादन आणि प्रक्रिया, जैविक घटक उत्पादन तंत्रज्ञान. कृषी पदवीधर
स्वतःचे कृषी सेवा केंद्र, जैविक खतांचा कारखाना, बीजोत्पादन तसेच इतर कृषीपूरक व्यवसाय स्थापन करून समाजातील इतर घटकांनादेखील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो.
प्रा. डॉ. बापूसाहेब भाकरे 7588005890
डॉ. विशाल गमे 9403929617
(मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दु. सी. पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव, नाशिक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *