पावसाळ्यात केसांची निगा

पावसाळ्यात केस जास्त गळतात का? डॅन्डरफ जास्त होतो का?
पावसाळ्यात केस जास्त गळतात आणि डॅन्ड्रफदेखील वाढतो आणि यामागे अनेक कारणं आहेत. पावसाच्या दिवसांमध्ये हवामान खूपच दमट असतं, त्यामुळे आपल्या टाळूवर बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त वाढते. विशेषतः जर केस ओले राहिले किंवा पावसाचं पाणी टाळूवर साचलं तर डॅन्ड्रफ वाढतो आणि स्कॅल्पवर खाज, लालसरपणा व कोरडेपणा दिसून येतो. दुसरीकडे, पावसाचं पाणी अनेकदा प्रदूषित आणि अम्लीय स्वरूपाचं असतं, जे केसांच्या मुळांवर परिणाम करून केसांची मुळं कमकुवत करतं. यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळायला लागतात.
या समस्यांवर काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. नीम आणि नारळ तेल एकत्र करून स्कॅल्पला लावल्यास अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल प्रभाव मिळतो. कोरफड आणि लिंबाचा रस मिक्स करून स्कॅल्पवर लावल्यास डॅन्ड्रफ कमी होतो आणि थंडावा मिळतो. मेथीचे दाणे भिजवून त्यात दही मिसळून बनवलेला मास्क केसांच्या मुळांना बळकटी देतो आणि डॅन्ड्रफसुद्धा नियंत्रित करतो. त्याचप्रमाणे कांद्याचा रस टाळूवर लावल्यास केस गळती कमी होते आणि नवीन केस उगमाला मदत होते.
पावसाळ्यात केसांच्या योग्य निगेसाठी केस ओले असताना बांधू नयेत, केस व्यवस्थित सुकवावेत आणि स्कॅल्प स्वच्छ ठेवावा. याशिवाय, प्रोटीनयुक्त आहार घेणं, पुरेसे पाणी पिणं आणि केसांना वेळोवेळी घरगुती उपचार देणं हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

पावसाळ्यात योग्य शाम्पू कसा निवडाल?

डॅन्ड्रफसाठी : नीम, टीट्री, झिंक असलेला अ‍ॅन्टी ड्रॅन्ड्रफ शाम्पू निवडा.

फंगल इन्फेक्शनसाठी : केस गळतीसाठी बायोटीन, केरोटीन, प्रोटीन बेस शाम्पू वापरा.

कोरडे व नाजूक केसासाठी :  सल्फेट फ्री, निवडा.

सेंसिटिव्ह स्कॅल्पसाठी : पीएच बेस आणि माइल्ड शाम्पू वापरा

टीप : पावसाचं पाणी लागल्यानंतर केस नेहमी स्वच्छ आणि सुकवलेले ठेवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *