ठाकरे गटाला मोठा धक्का: चार दिवसांपूर्वी नियुक्त केलेले महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपात करणार प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का: चार दिवसांपूर्वी नियुक्त केलेले महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपात करणार प्रवेश

उपनेते सुनील बागूलही घेणार कमळ हाती

पंचवटी: प्रतिनिधी

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विलास शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या जागी महानगर प्रमुख म्हणून नियुक्त केलेलं मामा राजवाडे भाजपात प्रवेश करणार आहेत.  याशिवाय उपनेते सुनील बागूल  ,सचिन मराठे, प्रशांत दिवे, कन्नू ताजने भगवंत पाठक, अजय बागुल सीमा ताजने, कमलेश बोडके हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. शरद पवार गटात विधानसभा निवडणुकीच्या वेळी आलेले गणेश गीते हे देखील पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे गटाला एका मागून एक धक्के बसत असल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला माणसे सांभाळणे अवघड झाले आहे. एकीकडे ठाकरे बंधु मनोमिलन चर्चा घडत असताना अनेक मंडळी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही भाजपात तर काही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत, गिरीश महाजन यांनी आगामी महापालिका निवडणुकीत शंभर प्लस चे उद्धिष्ट ठेवले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील अनेक जण भाजपात घेऊन पक्ष अधिक प्रमाणात मजबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

यांचा होणार भाजपात प्रवेश

शिवसेना उपनेते सुनील बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे ,सचिन मराठे, प्रशांत दिवे, कन्नू ताजने भगवंत पाठक, अजय बागुल सीमा ताजने गणेश गीते कमलेश बोडके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *