नाशिक : प्रतिनिधी
पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरेंच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या पदाधिकार्यांकडून सिडको परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी खुटवडनगर येथील सिद्धी बँक्वेट हॉलमधील सोहळ्यात आ. हिरेंची वहीतुला करण्यात आली. दिवसभर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांकडून आ. हिरेंचे अभीष्टचिंतन करण्यात आले.
मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, माजी महापौर रंजना भानसी, माजी नगरसेवक उद्धव निमसे, दिनकर आढाव, शिवाजी गांगुर्डे, राजेंद्र महाले, अश्विनी बोरस्ते, चंद्रकांत थोरात, अरुण पवार, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, प्रशांत जाधव, राष्ट्रवादीचे रवींद्र पगार, आनंद सोनवणे, प्रतिभा पवार, राकेश ढोमसे, राकेश दोंदे, मुकेश शहाणे, भगवान दोंदे, गोविंद घुगे, पुष्पा आव्हाड, सतीश सोनवणे, अॅड. श्याम बडोदे, भूषण राणे, छाया देवांग, अलका आहिरे, हर्षदा गायकर, मधुकर जाधव, सचिन कुलकर्णी, मंडल अध्यक्ष डॉ. वैभव महाले, नारायण जाधव, अजिंक्य गिते, राहुल गणोरे, जितेंद्र चोरडिया, प्रवीण पाटील, सागर शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
जनता युवा मोर्चाचे नवीन नाशिक अध्यक्ष अरुण दातीर, दीपक खवणे यांच्या वतीने सकाळी माउली लॉन्सजवळील साई हॉलमध्ये परिसरातील सुमारे दोनशे नागरिकांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांकडून आ. हिरेंचे औक्षण करण्यात आले. यावेळी रश्मीताई हिरे, मंडल अध्यक्ष डॉ. वैभव महाले, माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे, प्रतिभा पवार, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, शरद फडोळ, समाधान दातीर, विजय मोगल आदी उपस्थित होते.
सातपूर परिसरातही वाढदिवस साजरा
रामदास मेदगे यांच्या संकल्पनेतून चुंचाळे शिवारातील शाळा क्र. 73 मधील विद्यार्थ्यांंना आ. हिरेंच्या हस्ते पिटी गणवेशाचे वाटप करण्यात आले. घरकुल परिवार संस्थेच्या वतीने पिंपळगाव बहुला येथील मतिमंद महिलांच्या आश्रमात आ. हिरेंचे अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी येथील महिलांना अन्नदान करण्यात आले. यावेळी सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, रामहरी संभेराव, बजरंग शिंदे, गुलाब माळी, माजी नगरसेविका ज्योती शिंदे, भारतीताई माळी, दिनकर कांडेकर, नीलेश जोशी आदी उपस्थित होते. भाजपाचे बाळासाहेब जाधव, सरला जाधव यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांंना शालेय साहित्याचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. सिद्धिविनायक मित्रमंडळाकडून शिवाजीनगर येथे रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरजूंना मोफत चष्मेवाटपही करण्यात आले. या कार्यक्रमास माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे, मंडल अध्यक्ष नारायण जाधव, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, रश्मीताई हिरे, शिवसेनेचे आकाश पवार आदी उपस्थित होते.