अन्नविषबाधा ः
दूषित अन्न खाल्ल्यामुळे उलटी, जुलाब, पोटदुखी आदी त्रास होतो.
जुलाब व डायरिया ः
पाण्यातील जिवाणूंमुळे जुलाब होतो. शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात.
टायफॉइड सॅल्मोनेला नावाच्या जिवाणूमुळे होणारा आजार. दूषित अन्नपाण्यामुळे होतो.
हेल्मिन्थिक इंफेक्शन पावसाळ्यात जमिनीतून व अन्नातून कृमी शरीरात प्रवेश करतात. हिपॅटायटिस आणि ए यकृताला बाधा करणारे हे आजार दूषित पाणी आणि अन्नामुळे होतात.
लक्षणे ओळखण्यासाठी महत्त्वाचे संकेत
सतत पोटात मुरडा येणे किंवा दुखणे, उलटी होणे किंवा मळमळ, वारंवार जुलाब होणे, ताप येणे (विशेषतः टायफॉइड व हिपॅटायटिसमध्ये), थकवा, अशक्तपणा, भूक न लागणे, पिवळसर त्वचा व डोळे (हिपॅटायटिसचे लक्षण).
उपाय व प्रतिबंधात्मक काळजी
पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच प्या. पावसात पाण्यात जीवाणूंची संख्या वाढते, त्यामुळे नेहमी स्वच्छ पाणीच वापरावे. रस्त्यावरील व उघड्यावरचे अन्न टाळा. भजी, समोसे, पाणीपुरी यांसारखे अन्नपदार्थ हवामानामुळे दूषित होण्याची शक्यता असते.
हात धुण्याची सवय लावा. जेवणाआधी व टॉयलेटनंतर साबणाने हात धुवा.
ताजं, गरम अन्न खा. उरलेले अन्न पुन्हा गरम करून वापरणे टाळा. भिजलेले कपडे वेळेत बदला. ओले कपडे व शरीर आर्द्र ठेवणे यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
इम्युनिटी वाढवा. फळं, भाज्या, पाणी, ताजं अन्न व योग्य झोप घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.
लहान मुलं व वृद्ध यांची विशेष काळजी घ्या. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती तुलनेने कमी असते.
कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप किंवा जुलाब असल्यास, उलट्यांमुळे पाणी कमी होऊन शरीरात अशक्तपणा जाणवू लागल्यास, पिवळसर त्वचा व डोळे दिसू लागल्यास, वारंवार पोटदुखी होत असल्यास.
पावसाळ्यात सण-समारंभ, प्रवास व खाण्याची मजा यांची आपल्याला जाणीव असते. पण त्याहीपेक्षा आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. स्वच्छता, अन्नपाण्याची काळजी आणि वेळेवर उपचार हेच खरे संरक्षणाचे उपाय!