पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा वाढतो, पचनशक्ती कमी होते आणि रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. आयुर्वेदात पावसाळ्याला विकृतीचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात आपली दिनचर्या आणि आहार-विहार योग्य पद्धतीने ठेवणं आवश्यक आहे.

आयुर्वेदानुसार पावसाळ्यातील धोके ः
वातदोषाचा प्रकोप – सांधेदुखी, अंगदुखी, बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या तक्रारी वाढतात.
पचनशक्ती कमकुवत होते. अपचन, आम तयार होतो (शरीरात टॉक्सिन्स जमा होतात).
जंतुसंसर्गाचा धोका – पाण्यातून आणि अन्नातून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.
सामान्य माणसाने घ्यायची काळजी :
आहार : उकडून घेतलेले कोमट पाणी प्या.
भात, कढी, मूगडाळ यांसारखा हलका आणि पचण्यास सोपा आहार घ्या.
तुपाचे प्रमाण थोडे वाढवा, हे पचन सुधारते.
दही टाळा, त्याऐवजी ताक घ्या पण मध्यम प्रमाणात आणि कोमट स्वरूपात.
तळलेले, थंड, साखरयुक्त आणि जड अन्न टाळा.
जीवनशैली :
पाय सुकवणे महत्त्वाचे आहे. भिजल्यास लगेच कपडे बदला.
अधूनमधून सुंठ, हळद, मिरी यांचे काढे घ्या. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
वाफ घेणे – सर्दी-खोकल्यापासून बचाव.
योग आणि प्राणायाम करा. वात नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
नित्य अभ्यंग (तेल लावणे) विशेषतः नारळाचे किंवा तिळाचे तेल.
आयुर्वेदिक उपाय ः
त्रिफळा चूर्ण रात्री घ्या. आम आणि टॉक्सिन्स कमी करतो.
सिंधव लवण (सेंधव मीठ) आणि लिंबू टाकून गरम पाणी प्या. पचन सुधारते.
गुळवेल, तुलसी, सुंठ यांचे काढे रोज सकाळी किंवा रात्री एक वेळ.
पावसाळा आनंदाचा ऋतू असला तरी त्यामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रासदायक ठरतो. त्यामुळे
आयुर्वेदाच्या साध्या पण प्रभावी सल्ल्यांचे पालन करून आपण आरोग्य टिकवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *