आमदारांच्या गावात एसटी येईना!

विद्यार्थ्यांनी रोखली बस

शहापूर : प्रतिनिधी
’गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस’ हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे गावातील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना रोज दहा किलोमीटरचा पायपीट करत यावे लागत आहे. रोजच्या या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी धसई गावाच्या चौकात बस रोखली आहे.
शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांचे कोठारे हे गाव असून, जर आमदारांच्या गावातील विद्यार्थ्यांचे हे हाल आहेत तर शहापूर तालुक्यात काय समस्या असतील, असा प्रश्न निर्माण होत आहे. शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील व आमदारांचे गाव म्हणून ओळखले जाणारे कोठारे गावातील विद्यार्थी दररोज धसई गावातील हायस्कूलमध्ये जाण्यासाठी बसने प्रवास करतात. मात्र, शाळा सुटल्यानंतर परतीच्या प्रवासाला बस उपलब्ध नसल्याने यापैकी काही विद्यार्थी दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून घर गाठतात. कोठारे गावातील विद्यार्थी दसवी गावातील कै. किसन बाबा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत
आहेत.
सकाळी शाळेत जाण्यासाठी बस मिळत असे. मात्र, शाळा सुटल्यानंतर बस उपलब्ध होत नसल्याची समस्या आहे. दररोज शाळेत येण्यासाठी घरून पैसे मिळतात असे नाही. यामुळे बहुतेक विद्यार्थी जंगलातून प्रवास करतात. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने बिकट समस्या जाणवणार आहे. अनेक वेळा विद्यार्थी व पालक यांनी शहापूर स्थानकात जाऊन लेखी देत बसची मागणी केली. मात्र, बस उपलब्ध होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी दसवी गावात बस रोखून धरली. जोपर्यंत आम्हाला परतीच्या प्रवासाला बस उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत बस सोडणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. यामुळे बसमधील प्रवाशांचादेखील खोेळंबा झाला होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *