लिटल स्टार प्री-स्कूलमध्ये विठ्ठलनामाचा गजर

नाशिक :

उत्तमनगर येथील पी. जी. माळी एज्युकेशन सोसायटी संचालित लिटल स्टार प्री-स्कूलमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका जयश्री माळी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रिंगण सोहळ्यात वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी संत निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव व संत तुकाराम यांचा जयघोष करीत नृत्य केले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष गोकुळ माळी यांनी विद्यार्थ्यांना विठ्ठलाच्या अनेक आख्यायिका सांगितल्या. यावेळी शिक्षिका नीता खैरनार, शुभांगी खैरनार यांसह विद्यार्थी विठ्ठल, रुक्मिणी व वारकर्‍यांच्या वेशभूषेत उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *