उज्ज्वल निकम होणार खासदार
नाशिक: प्रतिनिधी
1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती मुर्मु यांनी आज चार जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन शृंखला, डॉ. मीनाक्षी जैन आदी ची नियुक्ती केली, उज्वल निकम यांना मुंबईतून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती मात्र, त्यांचा कॉंग्रेस च्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला.