नाशिक : प्रतिनिधी
श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट 2025 रोजी असून, या दिवशी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक विभागामार्फत विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
या तिन्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी नाशिकमधील नवीन सीबीएस (ठक्कर बसस्थानक) येथून त्र्यंबकेश्वरकडे जाणार्या एकूण 33 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील नियमित 160 फेर्यांव्यतिरिक्त या अतिरिक्त बससेवा कार्यरत असतील. साध्या बसचे तिकीट दर रु. 51/- असून, ई-बससाठी रु. 73/- तिकीट आकारण्यात येईल. तिसर्या श्रावणी सोमवारी (11 ऑगस्ट 2025) संदर्भात स्वतंत्र वाहतूक नियोजन लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक यांनी दिली आहे.
मार्ग जादा बसेसची संख्या
नाशिक ते त्र्यंबक – 25
इगतपुरी ते त्र्यंबक
(मार्गे म्हसुर्ती वैतरणा) – 5
पेठ ते त्र्यंबक
(मार्गे अंबोली) – 3