सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन
नाशिक प्रतिनिधी
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन आणि तृतीय भव्य राज्यस्तरीय कामगार मेळावा आज रविवार, (दि.27 )रोजी दुपारी 11 वाजता नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका येथे संपन्न होणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे अधिवेशनाचे प्रमुख अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, कार्याध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत, तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे.
या अधिवेशनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, उद्योग मंत्री उदय सामंत, आणि भाजप शहरप्रमुख सुनिल केदार प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून सरचिटणीस सतीश मेटकरी, केंद्रीय उपाध्यक्ष अनुप खैरणार, राज्य महिला संघटक पद्मश्री राजे, तसेच नाशिक विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागतोत्सुक व्यंकटेश मोरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोतम अहिरे, व केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्यासह राज्यभरातील एस.टी. कर्मचारी, पदाधिकारी, व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.