महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी
इंदिरानगर : वार्ताहर
पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील नरहरी नगर परिसरातील जी.डी.सावंत कॉलेज समोरील भागाच्या रस्त्याचे वर्षभरात चार वेळा काम केले. मात्र या पावसात रस्ता खराब होत झाल्याने महापालिकेच्या कामाचा दर्जा उघड झाला आहे. पुन्हा याच रस्त्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे मात्र नागरिकांना त्रास करावा लागत आहे.
या भागातील रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने रस्त्यावर खड्डे पडले होते. या ठिकाणी पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी थांबून वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. यामुळे अपघातही होत आहेत. चार वेळा या रस्त्याचे काम करण्यात आले.मात्र महापालिका प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नाही. कामाचा केवळ देखावा केला जातो. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही दिवसातच पुन्हा रस्ता खराब होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आता पुन्हा याच रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मनपाचे चांगल्या दर्जाचे काम करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
चार वेळा एकाच रस्त्याचे काम करूनही रस्ता खराब होतो यावरून मनपाच्या कामाचा दर्जा समजतो. अशा पद्धतीने मनपा आधिकारी काम करत असतील तर ते चुकीचे आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
– डॉ.पुष्पा पाटील नवले, सामाजिक कार्यकर्त्या.