रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय द्याल?

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण आहे. या खास दिवशी बाजारातून महागड्या भेटवस्तू आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवलेले गिफ्ट अधिक खास वाटतात.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, प्रदूषण आणि ताणामुळे त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेला एक खास होममेड स्किन केअर हॅम्पर तुमच्या बहिणीला नक्कीच आवडेल.
होममेड फेस स्क्रब ः हॅम्परमध्ये सर्वांत आधी नैसर्गिक फेस स्क्रब ठेवा. तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता किंवा बेसन, हळद आणि दही वापरून घरीच तयार करू शकता.
डीआयवाय फेस मास्क : हॅम्परमध्ये फेस मास्कचा समावेश करा. मुलतानी माती, गुलाबजल आणि कोरफडीचा गर वापरून तुम्ही घरीच नैसर्गिक फेस मास्क बनवू शकता.
होममेड लिप बाम : हॅम्परला आणखी खास बनवण्यासाठी खोबरेल तेल आणि मध वापरून घरगुती लिप बाम तयार करा. हा रसायनमुक्त असतो आणि जास्त काळ टिकतो.
बॉडी स्क्रब : शरीराची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी बॉडी स्क्रब आवश्यक आहे. तुम्ही कॉफी, साखर व ऑलिव्ह ऑइल एकत्र करून घरच्या घरी बॉडी स्क्रब बनवू शकता.
इतर आवश्यक वस्तू : तुम्ही या हॅम्परमध्ये सनस्क्रीन लोशन, मॉइश्चराइजर, फेस वॉश आणि सिरम यांसारख्या इतर गोष्टीही ठेवू शकता.
गोड सरप्राइज : या सर्व गोष्टींसोबत हॅम्परमध्ये काही चॉकलेट्स ठेवल्यास ते अधिक आकर्षक दिसेल.

हॅम्परचे पॅकिंग कसे कराल?
एक सुंदर बास्केट किंवा लाकडी बॉक्स निवडा.
त्यात आकर्षक बॉटल्स आणि जारमध्ये सगळे प्रॉडक्ट्स ठेवा.
प्रत्येक प्रॉडक्टवर त्याचं नाव आणि उपयोग लिहिलेले छोटे टॅग लावा.
हॅम्परमध्ये काही फुले, सुंदर रिबन आणि एक हॅप्पी राखी कार्ड ठेवा.
जर तुमच्या बहिणीला मेकअपची आवड असेल, तर एक लिपस्टिक, काजल किंवा छोटा मेकअप ब्रश सेटही त्यात ठेवू शकता.
या पद्धतीने तयार केलेला होममेड स्किन केअर हॅम्पर तुमच्या बहिणीला नक्कीच आवडेल आणि तुमच्या नात्यातील गोडवा वाढवेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *