निसर्गाशी आदिवासींचे नाते

नऊ ऑगस्ट हा जगभरात आदिवासी विश्व दिन म्हणून साजरा केला जातो. ही आदिवासीच्या बाबतीत गौरवशाली बाब आहे. या दिवस 1993 मध्ये सर्वप्रथम जागतिक संघटना यांनी घोषित केला आणि खर्‍या अर्थाने तो 2004 पासून देशात विविध राज्यांत व देशभरात साजरा होऊ लागला आणि आपले अधिकार, आपली संस्कृती, जीवनपद्धती नि पूर्वकालपासून असणारे निसर्गाचे नाते, यातून त्याचे जगासमोर प्रदर्शन, अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून प्रदर्शन होऊ लागले. आता तर हा दिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा होता तो एक आपला मोठा सणाचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा होऊ लागला आहे. यात केवळ आदिवासीच नाही तर इतर जातीधर्माचे लोक सहभागी होऊन आदिवासी परंपरेची जाणीव आणि रीतिरिवाज आणि माहिती करून घेत आहेत. परंतु अलीकडच्या काळात जो आदिवासी हजारो वर्षांपासून निसर्गाशी म्हणजे जल, जंगल, जमीन यांच्याशी नाते असणारा आदिवासी आता आपले मूळ तत्त्व विसरून तो काही दिवसांतच देशोधडीला लागणार, अशी चिन्हे सर्वत्र दिसू लागली आहेत. मुळातच इथला आदिवासी लवकर संपून त्याचा नायनाट व्हावा, अशी बहुतेक राजकर्ते आणि भांडवलशाही यांचे मत आहे. पण त्यांच्या बोलण्यात कणवळा मात्र अश्रू पुसून गोड घास भरवणीने हेे काम आहे. हे तितकेच नाकारून चालणार नाही.
आदिवासी जंगलचा राजा की त्या ठिकाणाहून वजा, हे पाहणे गरजेचे आहे. मुळातच आदिवासी हा निसर्ग आणि पर्यावरण यावर त्याचे जीवनमान अवलंबून आहे, तर आदिवासींचा निसर्गवाद म्हणजे काय? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. बर्‍याच वेळी आपण वाचतो, लिहितो, ऐकतो, की मुळातच जगातील आदिवासी हा निसर्गवादी आहे, मग निसर्गवाद आपण नेमकं कशाला म्हणूया. मुळातच वाद म्हणजे विचार. जसा समाजवाद. हा समाज यावर भाष्य करतो, मार्क्सवाद हा वर्ग संघर्ष यावर आधारित विचार आहे. हिंदुत्ववाद हा धर्मातील सनातन विचारप्रणाली अवलंबवितो. गांधीवाद हा अहिंसा जीवन जगण्याची ओळख देतो, तसाच आदिवासी समाज बांधवांचे जीवनविषयक जगण्याची ओळख करून देणारा निसर्गवाद आहे.तो केवळ निसर्गाची जोडलेली श्रद्धा किंवा पर्यावरणपूरक वागणूक नाही, तर ती एक समाजव्यवस्था, आर्थिक रचना आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असून, यावर आदिवासी समाजाचे जीवनमान अवलंबून आहे. निसर्गवाद हा या समाजाला नवीन दृष्टी आणि जगण्याची कला आत्मसात करणारा आहे. विशेष म्हणजे, आजच्या गतिमान युगात मानव हा त्याकडे फक्त हव्यास आणि आपले संसाधन म्हणून बघतो आहे.जंगलातील झाड याकडे केवळ लाकूड म्हणून ते अमलात आणायचे, अनाठायी वृक्षतोड करायची, तर नदी म्हणजे पाणी, डोंगर म्हणजे खनिज, जमीन म्हणजे मालकी, तिचा कशाही पद्धतीने उपभोग घेऊन वाटेल ते करायचे. अशा उपयोगितावादी दृष्टिकोनातून निसर्गाचे शोषण सुरू आहे. खरंतर आदिवासी समाजाचे गरजेपुरते निसर्गाशी नाते अगदी प्रामाणिक असते. तो निसर्गाकडून घेतो, पण आणि देतोपण, तो घेतोपण आपल्या हव्यासाने नाही, तर हरजेने जंगलातील फळे, वनौषधी, लाकूड व अन्य गौण संपत्ती ही तो फक्त गरजेपुरते वापरतो. तो कुठल्याही वस्तूचा साठा न करता विक्री करत नाही. त्याचे हे स्वाभाविक जीवन स्वतः आणि समाजापुरते मर्यादित असून, तो निसर्गसवर्धनाचे मूळ तत्त्व जाणून मर्यादा ओळखतो. जे निसर्गाने भरभरून दिले आहे त्यातील बीजारोपण व्हावे म्हणून पुन्हा तो निसर्गाला अर्पण करतो. नवीन मागील पिढीचा विचार करतो. आज सर्वत्र आधुनिक भांडवलशाही याची जणू स्पर्धाच लागली आहे. समाजातील मालकी हक्क हा वैयक्तिक असून, त्याच्या या मालकी हक्कावर आज भांडवलशाही, व्यक्ती आणि मोठंमोठे राजकारणी, उद्योेगपती यांच्या नजरा खिळून आहेत. त्यामुळे आज त्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी काबीज करून येथील जंगल नष्ट केले जात आहे. त्या ठिकाणी मोठमोठे रिसॉर्ट व प्लॉट करून शहरी व्यक्तींचा होणारा कोंडमारा आता खेड्यातच्या शेजारी येऊन, खेड्याची ओळख आता धूसर होत आहे. येथील जीवनमान आणि संस्कृती यावर कृत्रिम झालीचा पेहराव परिधान केला आहे. गावाचं जंगल हे गावच असते? ते सामूहिक पद्धतीने वापरले जाते. मुळातच आदिवासी समाज हा पूर्वपारपासून निसर्गावर अवलंबून असल्याने तो निसर्गालाच देव मानत आहे. झाड, डोंगर, नद्या, प्राणी, वायू, अग्नी, अवकाश याची तो पूजा करतो. वनदेवता, भूमाता, जलदेवता याच्याशी त्यांनी अगदी जिव्हाळ्याचे नाते जपले आहे. म्हणून त्याची तो पूजाअर्चा करतो. होय आदिवासी देवतांना कोंबडे, बकरा चालतो, हेही नाकारून चालणार नाही. त्याचे कारण असे आहे की, त्याला शहरातील लोकांसारखे रोज मटण, मासे मिळत नाहीत. त्यामुळे जर कधी त्याने देवाला कोंबडा, बकरा मारला तर तो काही एकटा खात नाही. एकप्रकारे सर्वांमिळून गावजेवण असते. सर्वच सामूहिक रीतीने. वर्षातून किमान दोन वेळा तरी त्यांना मटण, मांस खायला मिळते. यात सर्व गाव अगदी मनापासून समाधानी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *