दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी
दिंडोरी ग्रामस्थांचा नाशिक कळवण मार्गावर रास्ता रोको
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान, दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून, मयत महिलेचे नातेवाईक वनविभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह नेण्याच्या तयारीत आहे. इंदुरीकर मस्तांमध्ये अतिशय संताप व्यक्त केला जात आहे.त्यामळे पोलीस आणि नातेवाईक यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे.दरम्यान, दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून, मयत महिलेचे नातेवाईक वनविभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह नेण्याच्या तयारीत आहे. त्यामळे पोलीस आणि नातेवाईक यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, जनाबाई बदादे (६५)असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या नाव आहे. शेतात काम करत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर आजुबाजूच्या कामगारांनी तिला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले. मात्र तिच्या मानेला बिबट्याने लचका घेतल्याने ती जागीच ठार झाली.दरम्यान, दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने दिंडोरी ग्रामस्थांनी तीव्र संताप उसळला असून, मयत महिलेचे नातेवाईक वनविभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह नेण्याच्या तयारीत आहे. दिंडोरी ग्रामस्थांनी नाशिक कळवण रस्त्यावर आंदोलन केले आहे. त्यामुळे दिंडोरी कळवण रस्त्यावर ट्राफिक जाम झाली आहे.