पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी फरार

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोक्सो गुन्ह्यातील आरोपी फरार

,अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर चौकीतील घटना

सिडको : दिलीपराज सोनार

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर पोलीस चौकीतून पोक्सो कायद्यांतर्गत अटक केलेला संशयित शनिवारी सायंकाळी पवन नगर चौकीच्या भिंतीवरुन उडी मारून पोलीसांच्या हातावर तुरीदेऊन पसार झाल्याची घटना घडल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.
अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो गुन्ह्यात अतुल प्रकाश तुंबडे (वय २०, मुळ रा. राहता जि अहिल्यानगर सध्या रहा मनपसंद स्वीट जवळ पाटील नगर ) याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. अंबड पोलिसांच्या पथकाने राहता येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले होते. शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शनिवारी दुपारी संशयित आरोपी अतुल तुंबडेला पवननगर पोलीस चौकीत आणून पंचनामा सुरू असताना, त्याने संधी साधून पोलिसांना चकवा देत पवननगर चौकीच्या भिंतीवरून उडी मारून पसार झाला आहे दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या. सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सविता उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा सुरू असतानाच ही घटना घडल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंबड पोलिसांनी विविध भागांत शोधमोहीम सुरू केली आहे. संशयिताला पकडण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र पोलीस कोठडीत असलेला आरोपी पोलिसांच्या हातून पसार झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर देखील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *