मेघा आहेर ठरली सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू

मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात

मनमाड : प्रतिनिधी
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना, नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना, जय भवानी व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक जिल्ह्यातील व मनमाड शहरातील पहिल्या अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेला महिला खेळाडूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा बहुमान मेघा संतोष आहेर हिने पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन सिद्धी क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दराडे, छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पोद्दार, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, जय भवानी व्यायामशाळेचे पोपट बेदमुथा, डॉ. दत्ता शिंपी, राजेश परदेशी, आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता काळे, आकांक्षा व्यवहारे व वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. आठ विविध वजनी गटात झाल्या.
स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून डॉ विजय देशमुख, राजेंद्र सोनवणे, सुनील दळवी, योगेश चव्हाण, योगेश महाजन, तुषार सपकाळे, कल्पेश महाजन, भाऊसाहेब खरात, पंकज त्रिवेदी यांनी कामकाज बघितले.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांनी सहभागी खेळाडूंना टी-शर्ट भेट दिले. विनोद सांगळे यांनी त्यांचे वडील (कै.) बंडू नाना सांगळे यांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह प्रदान केले. डॉ. शरद शिंदे, नगरसेवक महेंद्र शिरसाठ यांनी स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य दिले. स्पर्धेचे प्रास्ताविक वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी केले. सूत्रसंचालन आनंद काकड यांनी केले. प्रशांत सानप यांनी आभार मानले. मनोगत डॉ. दत्ता शिंपी यांनी केले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन कुणाल गायकवाड, मुकेश निकाळे, मुकुंद आहेर, जयराज परदेशी, पूजा परदेशी, खुशाली गांगुर्डे, नूतन दराडे, पवन निरभवणे, सुनील कांगणे सुरेश नेटारे यांनी केले. जय भवानी

जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल

जिल्हास्तरीय अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेचा निकाल :
44 किलो- प्रथम दिव्या सोनवणे, द्वितीय- श्रेया सोनार, तृतीय- भाग्यश्री पवार. 48 किलो- प्रथम वीणाताई आहेर, द्वितीय- श्रावणी पुरंदरे, तृतीय- वैष्णवी शुक्ला. 53 किलो- प्रथम मेघा आहेर, द्वितीय- पूर्वा मौर्य, तृतीय- शामल तायडे. 58 किलो- प्रथम आर्या पगार, द्वितीय- मुग्धा माळी, तृतीय- कावेरी वाबळे. 63 किलो- प्रथम प्रांजल आंधळे, द्वितीय- साक्षी पवार, तृतीय-हर्षिता कुंगर. 69 किलो- प्रथम अक्षरा व्यवहारे, द्वितीय- श्रावणी सोनार, तृतीय- श्रावणी मंडलिक. 77 किलो- प्रथम करुणा गाढे, द्वितीय- प्रांजल कुनगर, तृतीय- ऐश्वर्या गांगुर्डे. 77 किलो- प्रथम कस्तुरी कातकडेे, द्वितीय- श्रद्धा माळवतकर, तृतीय- करिष्मा शहा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *