पुरुषोत्तम नाईक
दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025
मेष : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणीतून मार्ग सापडतील. व्यापारी, व्यावसायिकांना सुखवार्ता कळतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. विरोधकांच्या कारवायांमुळे दुर्लक्ष करू नका. प्रकृती सांभाळा.
वृषभ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात अनुकूल निकल लागतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांनी जोरदार आगेकूच होईल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूलता प्राप्त होईल. प्रकृती चांगली राहील.
मिथुन : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र्, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. शेअरमध्ये लाभ होतील. प्रवास त्रासदायक ठरतील. वाहन जपून चालवा. नोकरदारांना मनस्ताप देणार्या घटना घडतील. व्यापारी, व्यावसायिकांना आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. प्रकृती सांभाळा.
कर्क : प्रगती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात विलंब होई. अध्यापक, प्र्राध्यापक, वकील मंडळींना अडचणी सतावतील. नोकरदारांची प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन यशस्वी होईल. प्रकृती सांभाळा.
सिंह : आर्थिक दिलासा
या सप्ताहात मंगळ, गुरू अनुकूल आहेत. रवी, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. धनचिंता सतावतील. शासकीय, कोर्ट, केचरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांचे वेळापत्रक बिघडेल. प्रकृतीची काळजी घ्या.
कन्या : पैसे मिळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. अडकलेले पैसे मिळतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक गणिते जुळतील. विरोधकांच्या कारवाया त्रस्त करतील. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : अनुकूलता प्राप्त होईल
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. मंगळ, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास त्रासदायक ठरतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना अनुकूलता प्राप्त होईल. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक : भाग्योदय होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, गुरू, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येतील. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
धनु : आर्थिक अडचणी
या सप्ताहात गुरू, रवी, मंगळ, राहू, केतू अनुकूल आहेत. बुध, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी सतावतील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांनी मनावर संयम घालावा. दुसर्यास मोठेपणा देण्यानेच कामे पूर्ण होतील. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात यशप्र्राप्ती होईल. प्रकृती जपा.
मकर : मन प्रसन्न राहील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. प्रेमीजनांना अनुकूलता प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मतभेद मिटतील. मंगलवार्ता कळतील. मन प्र्रसन्न राहील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : प्रवास टाळा
या सप्ताहात बुध, गुरू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवासात अडचणी येतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. मानसिक अस्वस्थ जाणवेल. विरोधकांच्या कारवाया त्रासदायक ठरतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून राहू नये. प्रकृती सांभाळा.
मीन : धनचिंतांना उतार
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, राहू, केतू, गुरू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंतांना उतार पडेल. पैशांची आवक वाढेल. कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवा. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. आरोग्य चांगले राहील.