25 हजारांहून अधिक नागरिक होणार मोर्चात सहभागी
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील गंभीर प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचार यांसह जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसे व शिवसेना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी (दि.12) सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा बी. डी. भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा एकत्रित काढण्यात येईल. यात 25 हजारांहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिली.
पत्रकार परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे आदी उपस्थित होते.
दिनकर पाटील म्हणाले, की मोर्चाविषयीची माहिती वरिष्ठांना दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक शहर व जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी यासह मूलभूत समस्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट व मनसे यांचा जनआक्रोश मोर्चा शुक्रवारी (दि. 12) बी. डी. भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार आहे. यात 25 हजारांहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत, असे मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला माजी आमदार वसंत गिते, मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, महिला उपाध्यक्ष सुजाता डेरे, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, उपनेते दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.
नाशिक शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत आहे. खून, हाणामार्या, ड्रग्जमाफिया, बालगुन्हेगारीत झालेली वाढ यामुळे शहराला गुन्हेगारांचा विळखा पडला आहे. नाशिकला कोणीच वाली उरला नाही. विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असेे माजी आमदार वसंत गिते म्हणाले.
गिते म्हणाले, की जसे मनपामध्ये परसेवेतील अधिकार्यांना आणले जात आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही चार मंत्री असताना, परजिल्ह्यातील मंत्री नाशकात लक्ष घालत आहेत. प्रशासकीय राजवटीत शहराचे वाटोळे झाले आहे. भयमुक्त नाशिकसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचेही गिते यांनी सांगितले.