मातोश्री अभियांत्रिकीत कौशल्याधिष्ठित पदवी अभ्यासक्रम

उद्योग क्षेत्रातील शंभर प्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवारी चर्चासत्र

नाशिक : प्रतिनिधी
कौशल्याधिष्ठित पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे नाशिकचे मातोश्री अभियांत्रिकी हे राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. सन 2025 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या नवीन अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील शंभर प्रतिनिधींच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (दि. 13 सप्टेंबर) या अभ्यासक्रमावर चर्चा करण्यासाठी विशेष चर्चासत्र होणार आहे.
मातोश्री शिक्षण संस्थेने शंभरहून अधिक उद्योगांशी सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राने गेले अनेक दिवस वेगवेगळ्या स्तरांवर अभ्यास केला. या चर्चासत्रासाठी सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. देवीदास गोल्हर, डॉ. प्रमोद पाटील प्रमुख अतिथी आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. वर्षा पाटील, डॉ. उदय नाईक, डॉ. जयंत चोपडे, डॉ. जयंत भांगळे, डॉ. अमोल सानेर, डॉ. श्रीधर खुले, डॉ. डी. डी. अहिरे, डॉ. स्वाती भावसार, डॉ. रंजित गावंडे आदी प्रयत्नशील आहेत.

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. शिक्षण आणि कौशल्यविकास या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणार असल्याने खर्‍या अर्थाने रोजगाराभिमुख शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकेल.
– कुणाल दराडे, सचिव, मातोश्री शिक्षणसंस्था

या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळणार आहे. त्यांना उद्योगात काम करताना टीमवर्क, संवादकौशल्य आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे, हे शिकायला मिळेल. पदवीनंतर नोकरीच्या संधींसाठी ते अधिक सक्षम
होतील.
– डॉ. गजानन खराटे, प्राचार्य, मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *