मालेगावला बनावट जन्मदाखले हजारावर जाणार

किरीट सोमय्या; 550 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मालेगाव : प्रतिनिधी
खोट्या कागदपत्रांच्या आधारे 550 जणांनी बनावट जन्मदाखले मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आरोपींची संख्या हजारावर जाणार असल्याची शक्यता भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली.
बनावट जन्मदाखले प्रकरणी भाजप नेते सोमय्या यांनी गुरुवारी (दि.11) मालेगाव गाठले. यावेळी त्यांनी छावणी, किल्ला पोलीस ठाणे व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सोमय्या यांनी अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्याकडे 550 बोगस जन्मदाखले प्रकरणांचे पुरावे सादर केले. याप्रकरणात यापूर्वीही सोमय्या यांनी एक हजार 44 बनावट जन्मदाखल्यांचा दावा केला होता. ज्यामुळे चार गुन्हे दाखल झाले आणि काही जणांना अटकही झाली. मालेगावात अशा प्रकारे सुमारे चार हजार बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी बनावट दाखले मिळवल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात आली. एसआयटीने /-…4

घुसखोरांबाबत बोलणे टाळले
‘शहरात बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना बनावट जन्मदाखला वितरित झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात येऊन तपास करण्यात आला. मात्र, या तपासात एकही बांगलादेशी अथवा रोहिंग्या आढळून आला नाही. तसा अहवालदेखील पथकाने शासनाला सादर केला आहे. याबाबत सोमय्या यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले.‘

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *