दिंडोरी ः प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील जानोरी, जऊळके दिंडोरी, शिवनाई, वरवंडी तसेच आंबेदिंडोरी या चार गावांच्या जमिनीच्या हद्दीत असलेल्या आंबेहिल या ठिकाणी प्रत्येक वेळी ए.सी.ई.एम. नाशिक येथे स्थिर रॉकेट मोटर प्रशिक्षण करत असतात. आजूबाजूच्या गावांना किंवा ग्रामपंचायतींना घटनेच्या दोन दिवस अगोदर पत्रक दिले जाते; परंतु यावेळेस जानोरी ग्रामपंचायतीला कोणतेही पत्र किंवा फोनद्वारे माहिती न देता शुक्रवारी (दि. 12) रात्री आठ वाजेच्या दरम्यान भारत सरकार रक्षा मंत्रालय रक्षा अनुसंधान एव संघटन ऊर्जा पदार्थ उन्नत केंद्र यांनी ए.सी.ई.एम. रॉकेट मोटर प्रशिक्षण केल्याने जानोरी परिसरात मोठा आवाज झाल्याने जानोरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले होते.
ग्रामपंचायतीला व आसपासच्या ग्रामस्थांना व शेतकर्यांना कळवले जाते. परंतु, या वेळेस ग्रामपंचायतीला कोणतेही पत्र न देता तसेच आसपासच्या शेतकर्यांना व ग्रामस्थांना न कळवता मोटर प्रशिक्षण केल्याने जानोरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
-सुभाष नेहेरे, सरपंच, जानोरीभारत सरकार मंत्रालय रक्षा अनुसंधान विकास संघटन पदार्थ आंबेहिल (डीआरडीओ)मध्ये जानोरी गावातील शेतकर्यांची सर्वांत जास्त जमीन गेली असतानाही जानोरी गावातील शेतकर्यांना ‘डीआरडीओ’चा कोणताही फायदा झालेला नाही, तसेच ‘डीआरडीओ’मध्ये कोणतेही मोटर प्रशिक्षण होत असताना जानोरी ग्रामपंचायतीला किंवा आसपासच्या शेतकर्यांना कळवले पाहिजे. परंतु, काल डीआरडीओने मोटर प्रशिक्षण केले. त्यावेळेस जानोरी गावातील शेतकरी तसेच ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता मोटर प्रशिक्षण केल्याने जानोरी परिसरात मोठ्या आवाजाने व जाळ दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यामुळे डीआरडीओ जानोरी ग्रामपंचायतीला किंवा शेतकर्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही. – हर्षल काठे, उपसरपंच
याबाबत ए.सी.ई.एम. नाशिक येथे स्थिर रॉकेट मोटर परीक्षण शुक्रवारी (दि. 12) दुपारी करण्यात येईल. या परीक्षणाचा कालावधी हा 70 सेकंदांचा राहील. या परीक्षणाच्या कालावधीदरम्यान ध्वनी स्तर 180 डी.बी. राहील. या परीक्षणाच्या कालावधीदरम्यान नागरिकांना घाबरण्याची गरज नाही, असे डीआरडीओने पत्राद्वारे जऊळके ग्रामपंचायतीला कळविले होते. परंतु, प्रशिक्षणाची वेळ दुपारी असताना ते सायंकाळी झाल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला.