दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथे मायलेकींचा मृत्यू, आत्महत्या की हत्या?

दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथे मायलेकींचा मृत्यू, आत्महत्या की हत्या?
दिंडोरी तालुक्यात खळबळीचे वातावरण

दिंडोरी : प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथे विहिरीत मायलेकींचा स्कार्पने एकमेकांना कमरेला बांधलेला असलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.  आत्महत्या की हत्या ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथील पोलीस पाटील कविता कडाळी यांनी पोलिसांना दूरध्वनी द्वारे  माहिती कळवली की बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आमच्या गावातील महिला सुगंधा सोमनाथ कडाळी वय 28 वर्ष हिने तिची मुलगी नेहा सोमनाथ कडाळी वय 2 वर्ष     यांचा मृतदेह सोनगाव शिवारातील लक्ष्मण पुंजा भारस्कर यांच्या शेतातील विहिरीत मयत अवस्थेत मिळून आले    . पुढील तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जी.एस पवार, पोलीस हवालदार काळे हे तपास करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *