वाढते न्यूरोलॉजिकल आजार, उपाय क्लासिकल होमिओपॅथीत
गल्लीतल्या गोट्या, क्रिकेट, लपाछपी हे सारे खेळ आज मोबाइल स्क्रीनच्या उजेडात हरवत चालले आहेत. निरागस बालपण आता नोटिफिकेशनच्या आवाजात दडपलं जातंय. आज मोबाइल हा जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. मात्र, त्याचा अतिरेक मुलांच्या निरागस बालपणाला हळूहळू ग्रासतोय. अभ्यास, खेळ, सामाजिक जीवन याऐवजी मोबाइल स्क्रीन हा त्यांच्या जगाचा केंद्रबिंदू बनत आहे. ही सवय आता व्यसन म्हणून डोकं वर काढत असून, गंभीर न्यूरोलॉजिकल आजारांना आमंत्रण देत आहे.
(इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक न्यूरॉलॉजी (2023) )
भारतातील 62% शालेय मुले दिवसातून 3-6 तास मोबाइल वापरतात. जागतिक आरोग्य संघटना (2022) : जास्त स्क्रीन टाइम असलेल्या मुलांमध्ये- डीएचडी, चिंता व झोपेचे विकार 30 टक्क्यांनी जास्त.
मोबाइल व्यसनामुळे डिप्रेशनची लक्षणे 25 टक्क्यांनी वाढली. मुलांच्या आरोग्यावर न्यूरोलॉजिकल परिणाम : एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी, डोकेदुखी, झोपेचे विकार. शारीरिक : दृष्टी कमी, मान-पाठदुखी, स्थूलपणा. मानसिक : चिडचिड, हट्ट, सामाजिक दुरावा, असहिष्णुता.
क्लासिकल होमिओपॅथी?
मोबाइल व्यसन हा फक्त स्क्रीन टाइमचा प्रश्न नाही; तो मुलाच्या मन:स्थितीचा, स्वभावाचा आणि मेंदूच्या विकासाचा प्रश्न आहे.
अलोपॅथी/काउन्सेलिंग फक्त तात्पुरती लक्षणे कमी करतात. परंतु क्लासिकल होमिओपॅथी मुलाच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वावर उपचार करते. योग्य constitutional औषधाने चिडचिड, राग, बेचैनी, झोपेचा त्रास, एकाग्रतेचा अभाव यावर मूळ पातळीवर परिणाम होतो.
♦ मुलं शांत, स्थिर, सर्जनशील व अभ्यासू बनतात.
♦ क्लिनिकल अनुभवातून पालकांसाठी मार्गदर्शन.
♦ ठराविक वेळेतच मोबाइल वापर.
♦ वाचन, खेळ, कला, संगीताकडे मुलांना वळवा.
♦ झोपण्याच्या एक तास आधी मोबाइल बंद.
♦ पालक स्वतः आदर्श ठरवा.
मोबाइल ही काळाची गरज आहे, पण त्याचे व्यसन मुलांच्या न्यूरोलॉजिकल आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. डीएचडी, चिंता, डिप्रेशन ही वाढती उदाहरणे जागं करणारी आहेत.
क्लासिकल होमिओपॅथी हा सर्वांत सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहे. ती फक्त लक्षणांवर नाही तर मुलाच्या मेंदू, मन व स्वभावाला संतुलित करून भविष्य घडवते. आज मोबाइल तुमच्या मुलाचे बालपण हिसकावतोय. उद्या त्याचे भविष्य हिरावून नेऊ नये. म्हणूनच वेळेत सजग होऊया.