अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

मुंबई: पिंजरा, नवरंग, झणक झणक पायल बाजे या सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनय आणि नृत्य अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ख्या त नाम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे आज निधन झाले. त्या 94 वर्षाच्या होत्या. पिंजरा चित्रपटात त्यांनी साकारलेली तमागिरीनची भूमिका प्रेक्षकांच्या आजही समरणात आहे. आपल्या नृत्य कौशल्य आणि दिलखेचक अदाकारीने एक काळ त्यांनी गाजवला. नृत्य प्रधान सिनेमांना त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, आधा है चंद्रमा, झणक झणक पायल बाजे, अरे जारे हठ नटखट, या गीतामधील त्यांच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना मोहिनी घातली, पंडित गोपीकृष्ण यांच्या कडून त्यांनी नृत्याचे धडे गिरवले, शांताराम यांनी आपल्या आयुष्यात तीन लग्ने केली, संध्या या तिसरी पत्नी होत्या,

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत संध्या यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *