शहरातील पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले!

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांचा मास्टर स्ट्रोक

सिडको/पंचवटी : प्रतिनिधी
पोलिस आयुक्तालय हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून खून, अमली पदार्थांची विक्री आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सलग घडणार्‍या गुन्ह्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस यंत्रणेवर नागरिक आणि राजकीय नेत्यांकडून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तत्काळ पोलिस यंत्रणेत मोठा फेरबदल करून गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जुन्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर नव्याने पदभार स्वीकारणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवर गुन्हेगारांचा समूळ नायनाट करूरुन गुन्हेगारी अटोक्यात आणण्याची जबाबदारी आयुक्तांनी दिली असली, तरी आगामी काळात तरी गुन्हेगारीला लगाम लागेल की नाही, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मागणीची दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठा निर्णय घेत 12 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. गुन्हेगारीला आळा बसावा आणि पोलिस यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत व्हावी, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

♦ अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड – गंगापूर
♦ गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत – अंबड
♦ अंबडचे दुय्यम निरीक्षक मनोहर कारंडे – इंदिरानगर
♦ भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे – सातपूर
♦ सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील – आडगाव
♦ मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरोटे – एमआयडीसी चुंचाळे
♦ सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलवडे – विशेष शाखा
♦ आडगावचे वरिष्ठ निरीक्षक संजय भिसे – सायबर पोलीस ठाणे
♦ एमआयडीसी चुंचाळेचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील- मुंबई नाका
♦ इंदिरानगरच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे- शहर वाहतूक शाखा
♦ वाहतूक शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक तुषार आढवू – सातपूर
♦ वाहतूक शाखा सातपूर युनिटचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख- वाहतूक शाखा द्वारका युनिट

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *