हायवाखाली चिरडून बाप-लेकीचा मृत्यू

वैजापूरजवळील घटना; मृत बोलठाणचे रहिवासी, महिला जखमी

                                                 अय्युब मुनीर शाह

                                                          अश्मिरा अय्युब शाह 

बोलठाण : प्रतिनिधी
भरधाव हायवा व दुचाकीच्या अपघातात बाप-लेक ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.3) वैजापूर शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या लाडगाव रस्त्यावर (रोठी परिसर) घडली. अय्युब मुनीर शाह (वय 46) व अश्मिरा अय्युब शाह (12) असे अपघातात ठार झालेल्या बाप-लेकीचे नाव आहे. अंजुम अय्युब शाह (वय 35, सर्व रा. बोलठाण, ता. नांदगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्युब शाह बोलठाण येथील रहिवासी होते. शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ते पत्नी अंजुम व त्यांची मुलगी अश्मिरा हे लाडगाव रस्त्याने दुचाकीवर प्रवास करत होते. दरम्यान, रोठी परिसरात त्यांची दुचाकी भरधाव हायवाच्या चाकाखाली येऊन अय्युब शाह चाकाखाली चिरडले गेले. ते जागीच ठार झाले, तर मुलगी अश्मिरा गंभीर जखमी झाली. याशिवाय त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या.

मैत्रीचा राजा म्हणून ओळख

या दुर्घटनेमुळे बोलठाण गावावर शोककळा पसरली आहे. अय्युब शाह यांची ओळख म्हणजे मैत्रीचा राजा म्हणून गावात होती. आठवडे बाजारात मसाले विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. विशेष म्हणजे, सात दिवसांतील सहा दिवस परिसरातील वेगवेगळे बाजार करायचे. अडलेल्या माणसाला कधीही अडवू नका, असे ते गावात प्रत्येकाला सांगत. त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *